Hanuman Sena News

देश विरोधक कृत्य करून देशवासीयांच्या भावना व हितास धोका पोहोचविणाऱ्या विधानांवर मलकापूर पोलिसांनी गमतीत घेऊन केली कारवाई... विक्रांत जाधव



मलकापूर: मलकापूर पोलीस स्टेशन ला समज देवून FIR मध्ये सुधारित कलम वाढवून योग्य कारवाई करणे बाबत मा.जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलडाणा यांना सामाजिक कार्यकर्ते विक्रांत सुभाषराव जाधव मलकापूर यांनी निवेदनामध्ये नमूदकेले आहे कि मी विक्रांत जाधव रा. विष्णुवाडी मलकापूर दि. १४/०८/२०२३ रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला इंस्टाग्रामवरील मुजमील खान अहेमद खान याने १४ ऑगस्ट २०२३ रोजी इनडीपेंडन्स डे पाकीस्थान तसेच पाकीस्थानी झेंडे, प्राउड टू बी अ पाकिस्थानी बाबत पोस्ट टाकली होती. मी याबाबत त्यादिवशी सायं ६ वा. पासून पोलीस स्टेशन मलकापूरला तक्रार देण्याकरिता गेलो असता रात्री १२ वाजेपर्यंत बसवून माझी FIR तर घेतली मात्र त्यात तोडी रिपोर्ट मध्ये ५०५ब, ५०४, ५०६ कलम लावण्यात यावी अशी तोंडी तक्रारीत माझा कडून लिहून घेवून त्याप्रमाणे तक्रार दाखल केली.वास्तविक पाहता मी कायदे शास्त्राचा विद्यार्थी नसल्यामुळे मला यातील काही समजले नाही. पण आपल्या देशात राहून आपल्या शत्रू राष्ट्रचा झेंडा वापरून त्याला शुभेच्छा देणे मला योग्य वाटले नाही म्हणुन FIR केली होती. परंतु नंतर आरोपीस समज देवून सोडण्यात आल्याचे मला कळले. मला व राष्ट्रप्रेमी मंडळीना धक्काच बसला.त्यावर उहापोहो चर्चा केली असता यात कलम १२४अ, २९५अ, १५३अ व एस १२१ ते एस १३० दरम्यानची कलमे टाकावयास पाहिजे होती व कडक कारवाई व्हायला हवी होती. कारण आपला शेजारी शत्रुराष्ट्राबद्दल जो आपल्या देशावर आतंकवाद्याद्वारे हमले करतो,आपल्या सैनिकांना मारतो अश्या देशाशी आपल्या देशाने सर्व संबध तोडले आहे.आस्था प्रकारच्या देशाचा झेंडा डिजिटल माध्यमातून आपल्या देशात प्रयोग करुन शत्रू राष्ट्रास शुभेच्छा म्हणजे देशविरोधक कृत्य करुन देशवासीयांच्या भावना व हितास धोका पोहोचविणाऱ्या विधानांवर मलकापूर पोलिसांनी गमतीत घेवून कारवाई केल्याचे आमचे म्हणणे आहे.आपणास विनंती की आपण गांभीर्याने घेवून संबंधीतांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी व मलकापूर शहर पोलीस स्टेशन ला योग्य सूचना वजा समज देवून देशभक्ती बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी ही विनंती.आपण कार्यवाही नाही केल्यास मला न्यायालयीन मार्ग ने कार्यवाही करावी लागेल असे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत जाधव यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post