रितेश दहिभाते.
मलकापूर :- स्थानिक दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झाली. रांगोळीत प्रथम क्रमांक आवल सोनोने, वक्तृत्व स्पर्धेत ओमप्रकाश गवई तर निबंध स्पर्धेत प्रज्ञा वानखडे व माधुरी राउत यांनी मीळविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह वा दिक्षीत तर प्रमुख अतिथी म्हणून मतदार नोंदणी उपविभागीय कार्यालय मलकापूर येथील चंद्रशेखर पाटील, संजय वैराळे, यांचे सह व्यासपीठावर कार्यक्रम समन्वय तुळशीराम धुरंधर, प्रा. विजय पिंगळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक यांनी मतदार नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन कशा पध्दतीने करावी याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले. प्रा. डॉ. डी. एम. दरेगावे, नोडल अधिकारी यांनी नव मतदार नोंदणी व मतदार जनजागृतीसंदर्भात महाविद्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमाविषयी माहीती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रा. वा. दिक्षीत यांनी लोकशाहीत प्रत्येक मताला महत्व असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हाण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम धुरंधर यांनी मांडले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आकाश राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिक्षक म्हणून प्रा. अनिल सावळे, प्रा. रविंद्र पाटील यांनी भूमीका पार पाडली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. शेवटी कु. कोमल तायडे हीने उपस्थीतांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment