मलकापूर दि.१४ ऑगस्ट रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या वतीने चिखली रणथम ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्र.१५३ चे चौपदरीकरण पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व भुपृष्ठ वहन तथा जलमार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन (GVM) विद्यालयाच्या क्रीडांगणावर सकाळी ११.०० वाजता आयोजन करण्यात येणार आहे.राष्ट्रीय महामार्गा चौपदरी करण कामाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री ना. नितीजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीतसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते मोहन शर्मा, शहर अध्यक्ष मिलिंद डवले, तालुका अध्यक्ष संजय काजळे, महिला आघाडीच्या अश्विनी काकडे, साहेबराव पाटील , मधुर फासे, सुनिल अग्रवाल, रामभाऊ झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाचे ना. नितीनजी गडकरीच्या हस्ते 18 ऑगस्टला लोकार्पण- चेनसुखजी संचेती
Hanuman Sena News
0
Post a Comment