Hanuman Sena News

"लपून छपून भेटी-गाठी करायची", पवार काका-पुतण्याच्या भेटी बाबत सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या !



पुणे: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांशी सख्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. आजही (१२ ऑगस्ट) पुण्यात या दोन्ही नेत्यांची एका बड्या उद्योगाच्या घरी बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित होते. या गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमातून समोर येणाऱ्या दृश्यांवरून प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा देशात आणि राज्यात वेगळा ठसा आहे कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपून ठेवण्याची गरज नाही पवारांना असं जरी वाटलं की दादा आणि पवार साहेब एकत्र येणार आहेत तर त्यावरही ते उघडपणे भाष्य करणे इतके सक्षम आहेत ते तसे सक्षमपणे सांगू शकता लपून-छपून भेटीसाठी करायचे आहेत अंधारात ठेवायच्या आहे असं मला नाही वाटत जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून याबाबतीत आम्ही घाईघाईने निष्कर्ष काढणे आणि बोलणे योग्य ठरणार नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या उद्या किंवा परवा शरद पवार बोलणार आहेत मुंबईत या दोन नेत्यांची भेट झाली होती तेव्हाही ते बोलणार होते त्यावेळी बंगलोरला बैठक होती म्हणून त्यांना माध्यमांशी चर्चा झाली नाही माझ्या माहितीनुसार पवार यावर बोलणार आहेत ते चांगल्या प्रकारे या प्रकरणावर प्रकाश टाकू शकतील असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post