नाशिक : गाय ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत भावनेचा विषय असतो. दारापुढे गौधन असावेच अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. तसेच, शेतीपुरक व्यवसाय म्हणून गायीचे संगोपन करून गायीच्या दुधाची विक्रीही अनेक शेतकरी करत असतात. यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी राज्यभरातील तसेच परराज्यातील मोठ्या नामांकित जनावरांच्या बाजारातून शेतकरी खरेदी करत असतो. मात्र, नाशिकच्या निफाड तालुक्यात एका शेतकऱ्याला अत्यंत वाईट अनुभव आला आहे. सात दिवसापूर्वीच तब्बल दीड लाख रुपयांना खरेदी केलेल्या गायीच्या पोटात तब्बल पंचेचाळीस किलो प्लास्टीक असल्याची बाब समोर आली आहे. अखेर, शस्त्रक्रिया करून हे प्लास्टीक बाहेर काढण्यात आले आहे.निफाड तालुक्यातील विंचुर जवळील डोंगरगाव येथील शेतकरी आत्माराम सांगळे यांनी सात दिवसापूर्वी गुजरात येथून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दहा नवीन गायी खरेदी करून घरी आणल्या. त्यातील आठ महिने गाभण असलेली एक गाय दोन ते तीन दिवसापासून चारा खात नसल्याचे त्यांना लक्षात आले. त्यामुळे सांगळे यांनी विंचूर येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. भाऊराव सांगळे यांना याबाबत कल्पना दिली. तसेच गायीची तपासणी करायची विनंती केली. डॉ. सांगळे यांनी गायीची तपासणी केली असता गायीच्या पोटात काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोटात काहीतरी असल्याची खात्री झाल्यानंतर गाईच्या पोटाचीशस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार डॉक्टर सांगळे यांनी सेवा निवृत्त सहाय्यक अशोधन विकास अधिकारी डॉक्टर विलास भोर यांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली सुमारे तीन तास गाईच्या पोटाची शस्त्रक्रिया करत असताना धक्कादायक बाप समोर आली गाईच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे गोळे असल्याचे डॉक्टर सांगळे यांना आढळून आले शस्त्रक्रिया करताना टप्प्याटप्प्याने हे सर्व प्लास्टिकचे गोळे बाहेर काढण्यात आले तब्बल 45 किलो वजनाचे प्लास्टिक गाईच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे
गायीच्या पोटात 45 किलो प्लास्टिक; 7 दिवसांपूर्वीच दीड लाखात खरेदी...
Hanuman Sena News
0
Post a Comment