आधार युझर्ससाठी कोणतेही डिटेल्स ऑनलाइन अपडेट करण्यासाठी सध्या कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. लाखो भारतीयांच्या सोयीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार सेवेतील दस्तऐवजांचं ऑनलाइन अपडेट काही महिन्यांसाठी मोफत सुरू ठेवले आहे. जर तुम्हाला जन्मतारीख अपडेट करायची असेल तर ही प्रक्रिया खूप सोपीआहे.युआयडीएआयनं (UIDAI) नागरिकांनी आधारमध्ये दिलेली माहिती पुन्हा व्हेरिफाय करण्यासाठी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करण्याचं आवाहन केलंय. दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपूर्वी ज्यांना आधार जारी करण्यात आलंय आणि त्यानंतर ते अपडेट झालं नाही त्यांना ते अपडेट करण्यासंदर्भातही मेसेज करण्यात आलेत.कधीपर्यंत मोफत आधार अथॉरिटीनुसार, ऑनलाइन कागदपत्रं मोफत अपडेट करण्याची सेवा १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील. UIDAI ने १५ मार्चपासून ऑनलाइन अपडेट सेवा मोफत केली आहे.ऑफलाइनवर शुल्क लागू मोफत दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आधार केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच ५० रुपये शुल्क लागू होईल.जन्मतारीख, नाव-पत्ता कसा बदलाल आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला वन टाइम पासवर्ड (OTP) एन्टर करा.
'अपडेट डॉक्युमेंट' वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार युझरची माहिती दिसून येईल.
आता माहिती व्हेरिफाय करा, माहिती योग्य असल्यास पुढील हायपर-लिंकवर क्लिक करा.
ड्रॉपडाउन लिस्टमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुराव्यासाठी कागदपत्रांची निवडा.दस्तऐवज अपडेट करम्यासाठी कागदपत्रे अपलोड करा.अपडेट आणि स्वीकार्य कागदपत्रांची यादी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे
Post a Comment