Hanuman Sena News

अखेर भाजपाला जिल्हाध्यक्ष पदाचा मुहूर्त सापडला...




बुलढाणा: भाजपाला अखेर मुहूर्त सापडला कित्येक दिवसापासून भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष कोण होणार यावर तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते. आता त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्कामोर्तब केले असून बुलढाणा जिल्ह्यात आता पहिल्यांदा दोन जिल्हाध्यक्ष मिळाले आहे. घाटावर आणि घाटाखाली अशी रचना करण्यात आली असून घाटावरील जिल्ह्याचे मुख्यालय बुलढाणा तर घाटाखालील जिल्ह्याचे मुख्यालय खामगाव येथे राहील. घाटावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊळगाव राजाचे डॉ. गणेश मांटे संभाळणार असून खामगाव ची जबाबदारी या आधी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या जळगाव जामोदचे सचिन देशमुख यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली दोन जिल्हाध्यक्ष करण्यात येणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली मातृ संस्था मानणाऱ्या भाजपने संघटन वाढीसाठी आता संघाच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. संघाच्या रचनेत शासकीय बुलढाणा जिल्ह्याचे आधीपासूनच बुलढाणा आणि खामगाव असे दोन जिल्हे आहेत. शिवाय दोन्ही जिल्ह्यात काही नव्या तालुक्याची रचना सुद्धा संघाने कार्य विस्तारासाठी केली आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा तालुक्यातून धाड, चिखली तालुक्यातून अमडापुर तर खामगाव जिल्ह्यातून खामगाव चे विभाजन करून लाखनवाडा तालुका अशी रचना आहे. बुलढाणा जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार पाहता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांना पक्ष विस्तारासाठी सोयीचे व्हावे म्हणून आता खामगाव बुलढाणा असे दोन जिल्हे करण्यात आलेले आहेत. लोकप्रतिनिधींना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे असा सूर भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उमटला होता.त्यानुसार आता राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना संघटनात्मक जबाबदारी पासून मुक्त करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात घाटावर गणेश मांटे तर घाटा घाली सचिन देशमुख यांच्यावर भाजपाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. नव्या जवाबदारीचे नवे पदाधिकारी कसा न्याय देतात याकडे भाजपाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागलेले राहील.

Post a Comment

Previous Post Next Post