पुणे: लग्न नाही केले तर आपले फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत दोघांचे फोटो कुटुंबीयांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार वडगाव शेरी परिसरात घडला आहे. पूर्वीच्या प्रेमसंबंधांचा राग मनात धरून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.एका २७ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी धवल धीरज उपाध्याय (वय २४, रा. चंद्रपूर) याच्यासोबत महिलेचे पूर्वी प्रेमसंबंध होते. माझ्यासोबत लग्न कर असा धवलने महिलेकडे तगादा लावला. महिलेने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तरीही तिने ऐकले नाही म्हणून तिच्या बहिणीला तसेच पती आणि वडिलांना फोन करून धमकी दिली. त्यांनंतर धवलने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून महिलेसोबतचे फोटो अपलोड केले.तसेच ते महिलेच्या नातेवाइकांना पाठवून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.
लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केले दोघांचे फोटो वायरल...
Hanuman Sena News
0
Post a Comment