Hanuman Sena News

धक्कादायक ! पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; मग ACP ने स्वतःलाही संपवले...






पुणे: पुणे पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राज्याच्या पोलिस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याची गोळी झाडून हत्या केली.त्यानंतर स्वतःही गोळी झाडून जीवन संपवले. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.भारत शेखा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.तर पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळ्या झाडून या पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.तर त्यांची कुटुंब पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत होते.दरम्यान भारत गायकवाड शनिवारी सुट्टीवर पुण्यात आले होते.त्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली.त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले.परवाना असलेल्या त्यांच्या खाजगी पिस्तुलातून त्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.दरम्यान भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post