भोपाळ: मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तलाठ्याला लाच म्हणून 5000 रुपये घेतले.तितक्यात त्याला लोकायुक्तांच्या पथकाने रंगेहात पकडलं.लोकायुक्तांना पाहताच तलाठ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.त्यांने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात त्यांने हातातल्या नोटा तोंडात कोंबल्या.बघता बघता त्यांने नोटा गिळल्या. दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर आरोपी तलाठ्याला जवळच्या रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्याने गिळलेली रक्कम बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. (एसपीई) एसपी संजय साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी गजेंद्र सिंह यांनी त्याच्या खाजगी कार्यालयात 5000 रुपयाची लाच घेतली.परंतु लाच घेतल्यानंतर त्यांना लोकायुक्त विशेष पोलीस आस्थापनेने (एसपीई) सापळा रचल्याचे लक्षात आले.हा प्रकार लक्षात येताच तलाठी गजेंद्र सिंह याने लाचेची सर्व रक्कम खाऊन टाकली. पुढील तपास (एसपीई) एसपी संजय साहू करीत आहेत.
5000 रुपयाची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडले; पोलिसांना पाहताच तलाठ्याने नोटा गिळल्या ...
Hanuman Sena News
0
Post a Comment