Hanuman Sena News

खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत


बुलढाणा - रुमालावर काहीतरी औषध टाकून सुंगविल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी खामगाव येथील शंकर नगर भागात घडली. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. तिच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.याबाबत सविस्तर असे की, शहरातील शंकर नगर भागातील एका धार्मिक स्थळानजीक मुलीला रुमालावर काही तरी औषध टाकून सुंगविण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यामुळे घटनास्थळी आरडाओरडा झाल्याने एका महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. तर एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी रूककय्या परवीन शेख हफीज (वय २६) रा. शंकर या महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पिंकी राजेंद्र गोहर (वय ३०) रा. अमरावती ह. मु. रावण टेकडी खामगाव या महिलेविरोधात भादंवि कलम ३६३,५११ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन जोशी करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post