Hanuman Sena News

उज्वला योजना गोरगरिबांसाठी कुचकामी; गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे लाभार्थ्यांमध्ये रोष...



विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने धूर मुक्त भारत बनविण्याच्या उद्देशाने उज्वला गॅस योजना सुरू केली. याकरिता ग्रामीण भागातील महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. हजारो लाभार्थींनी याचा लाभ घेतला. परंतु गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांना इतक्या किमतीत सिलिंडर घेणे परवडेनासे झाले आहे. यामुळे उज्वला योजना अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या वतीने सुरुवातीच्या काही दिवसात गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्यात येत होती. त्यामुळे ग्राहकांना कमी पैसे लागत होते. त्यानंतर काही दिवस 25 ते 30 रुपये सबसिडीच्या नावावर जमा होत होती. परंतु आता सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरच्या लाभार्थ्यांना भुर्दंड वाढला आहे. त्या ग्रामीण भागात गॅस सिलिंडरवर घरपोच सेवासाठी शंभर रुपये अधिकचे द्यावे लागते. त्यामुळे लाभार्थ्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने धुरमुक्त भारत बनवण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन दिले. सुरुवातीला सिलिंडरची किंमत कमी असल्याने योजनेचा लाभार्थी सिलिंडर विकत घेत होते. सिलिंडरच्या दरात सतत भाव वाढ होत आहे. सतत दर वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांना चुलीवरच स्वयंपाक बनवावा लागत आहे. परिणामी सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली उज्वला योजना अपयशी होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post