Hanuman Sena News

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे दंगल थांबली- प्रकाश आंबेडकर...




नवी दिल्ली: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतलं आहे. त्यांच्या या कृतीवर भाजप आणि शिंदे गटाने टीका केली. तर ठाकरे गटानेही या प्रकरणावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. दरम्यान, औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली नवी दिल्ली येथे प्रकाशआंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी औरंगजेब कबरीवर जात त्यावर फुल वाहिली याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी कबरीवर फुल चढवली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. अनेकजण कबरीवर गेले आहेत. तसेच त्यांची यादीही माझ्याकडे आहे, असं आंबेडकर म्हणाले.संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली होती, तसेच त्यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते. संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली, जयचंदमुळे गेले असा इतिहास आहे. तसेच औरंगजेबने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोचवली. संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post