मलकापूर: मलकापूर येथे भाजपाची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ नेते चेनसुखजी संचेती व खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडली.बैठकीत मलकापूर तालुका आणि शहर बुथ प्रमुख व शक्ति केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तिकरण तसेच केंद्र व राज्यस्तरावरून पक्षमार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या काळात 11 कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी शालिनीताई बुंदे, मा.आमदार विजयराज शिंदे, शिवाभाऊ तायडे, विजय काका जाधव, केदार एकडे, संजय काजळे, शंकर पाटील, नागो राणे, विलास पाटील ,डॉ.नीलिमाताई झंवर, अश्विनीताई काकडे, अर्चनाताई शुक्ला, संतोष बोंबाटकर, विजुभाऊ डागा समवेत सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओडिसाच्या बालासोर मधील रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक मोहन शर्मा यांनी तर संचालन डॉ. योगेश पटणी यांनी केले.
मलकापुर येथे भाजपा बुथ सशक्तिकरण अभियाना अंतर्गत बैठक ...
Hanuman Sena News
0
Post a Comment