मलकापूर: मलकापूर नांदुरा या दोन्ही रेल्वे स्थानकावरील कोट्यावधी रुपयांची विकास कामे होणार आहे. या विकास कामांमुळे या दोन्ही रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष अॅड महेंद्र कुमार बुरड यांनी दिली आहे.मध्य रेल्वेची 170 वी डीआरयुसीसी ची महत्वपूर्ण बैठक 28 जून रोजी डी आर एम कार्यालय भुसावल येथे पार पडली. यावेळी उपस्थिती समिती सदस्य अॅड महेंद्र कुमार बुरड यांनी मलकापूर आणि नांदुरा रेल्वे स्टेशन वरील विविध समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. भुसावल - नागपूर पॅसेंजर सुरू करण्याबाबत अमरावती -मुंबई स्लीपर कोच वाढवण्याबाबत सुद्धा आग्रही मागणी लावून धरली. मलकापूर व नांदुरा स्थानकावर येत्या वर्षभरात विकास कामे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मलकापुरात दहा ते पंधरा कोटी व नांदुऱ्यात आठ ते दहा कोटी खर्च करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने सर्क्युलेटर एरियाचा विकास, बारा मीटर फूट ओव्हर ब्रिज, एस्क्युलेटर,दर्शनी भागाचा विकास, गुड मर्चंट, लेबर रूम, प्रतिक्षालय आणि इतर विकास कामांचा समावेश राहणार आहे. या विकासामुळे दोन्ही स्थानकाचे रूप पालटणार आहे असे अॅड बुरड यांनी सांगितले.
मलकापूर नांदुरा रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार..
Hanuman Sena News
0
Post a Comment