Hanuman Sena News

मी थांबणार नाही, झुकणार नाही... पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका...








परळी: गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उघडं नाराजी व्यक्त केली होती, आज स्व. गोपीनाथ मुंडे यांची स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान आज पंकजा मुंडे कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,  राजकारणात मला जे अनुभव आले. पण, गेल्या पाच वर्षातील अनुभव खूप अनोखे आहेत. माझं मत माध्यमांनी माझ्या माणसांपर्यंत पोहोचवलं. मी माझ्या लोकांसाठी लढणार, मी थांबणार नाही. झुकणार नाही आम्ही स्मरण करुन गोपीनाथ मुंडेंच वाक्य आठवलं तर एकच वाक्य ऐकू येतं ते म्हणजे, मी थांबणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. या नंतर हे वाक्य हजारो वर्ष उच्चारल तरीही या वाक्याच महत्व कमी होणार नाही. कुणाला धमकावण्यासाठी, इशारा करण्याची गरज नसते. ज्याला इशारा करायचा असतो तिथपर्यंत ते जात असते 'मी राजकारणात फक्त लोकांसाठी आहे, मी माझ्या परिवाराचे भलं करण्यासाठी राजकारणात नाही.मला ज्यावेळी भूमिका घ्यायची असेल तेव्हा मी तुम्हालाच भगवानगडावर बोलावून तुमच्या समोर भूमिका घेईन,कुणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन बंदुक चालवणार एवढे खांदे मला मिळाले नाही, मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करतात.पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोक भूमिका घेईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक नेते राजकारणात हरले यांना संधी देण्यात आले पण मला संधी देण्यात आली नाही मी माझे नेते अमित शहा यांना भेटणार आहे मी त्यांच्याकडे वेळ मागितली आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post