पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी धानावर ७ टक्के एमएसपी वाढवण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मुग डाळीसाठीचा किमान हमीभाव सर्वाधिक १०.४ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. शेंगदाण्यावार ९ टक्के. धानावर ७ टक्के, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ, सोयाबीन, सूर्यफूल यांच्यासाठीच्या हमीभावामध्ये ६-७ टक्के वाढ करण्यात आली आहे.सरकारने २०२३-२४ वर्षासाठी भाताच्या किमान हमीभावामध्ये १४३ रुपयांनी वाढ करून तो २ हजार १८३ रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना भातशेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचं उत्पन्न वाढवणे, हा यामागचा हेतू आहे. पंतप्रधाम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २०२३-२४ च्या पीक वर्षासाठी खरिपाच्या सर्व पिकांमध्ये हमीभावात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.अन्न आणि ग्राहक संबंधांचे मंत्री पीयूष गोयल यांनी सीसीईएच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, कृषिक्षेत्रामध्ये आम्ही सीएसीपीच्या शिफारशींच्या आधारावर हमीभाव निश्चित करतो. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट...
Hanuman Sena News
0
Post a Comment