Hanuman Sena News

ट्रकची बैलगाडीला धडक शेतकऱ्यांसह बैल ठार..



मलकापूर: भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीवरील शेतकरी ठार झाल्याची घटना 24 जून रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मृतकाचे भाऊ मनोहर पाटील यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 24 जून रोजी सकाळी दाताळा येथील शेतकरी गणेश शंकर पाटील हे बैलगाडीने सकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास बैलगाडी घेऊन शेताकडे बियाणे पेरणी करिता शेती साहित्य घेऊन दाताळा येथून मलकापूर रस्त्याने शेताकडे जात होते. दाताळा येथील घिर्णी पाट्याजवळ एम एच 06 बि डी 2481 या क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणाने ट्रक चालून शेतकऱ्यांच्या बैलगाडीला मागील भागाला जोरदार धडक दिली. त्यात शेतकरी गणेश पाटील व त्यांच्या बैलगाडीचा एक बैल हे जागेच ठार झाले.तर दुसरा बैलास मार लागला आहे.व बैलगाडी तसेच शेती साहित्याची भरपूर नुकसान झाले. ट्रक चालक हा बुलढाणा कडून मलकापूर कडे जात होता. या ट्रकने बैलगाडीला धडक दिल्यानंतर हा ट्रक ही रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. तर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. अशा फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध 279, 429, 427, 304- अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिर्झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास प्रशांत राठोड, हेड कॉन्स्टेबल सचिन दासर,प्रमोद पोलाखरे,गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post