Hanuman Sena News

बुलढाणा आगाराने तांत्रिक बिघाड असलेली बस पाठवली ; अनर्थ होताना टळला






बुलढाणा: काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आज चिखली बुलढाणा रोडवरील हातणी जवळच्या घाटात एसटी बसमधील प्रवाशांना आला.गाडी घाटात चढत असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बस उतारातून मागे घसरू लागली.चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून मोठ्या कौशल्याने बसची एक बाजू रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरवली. आणि बस जागेवर थांबण्यात यश मिळवले आणि बस मधील 50 पेक्षा अधिक प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला. 22 जूनच्या दुपारी साडेतीन च्या सुमारास MH 06 .S .8404 या क्रमांकाची बुलढाणा आगाराची बस चिखली वरून बुलढाणा कडे जात होती. 50 पेक्षा अधिक प्रवासी या बस मध्ये होते. हातणी जवळील घाटात बस पहिल्या गियर वर चढत असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले.त्यामुळे वर चढणारी बस मागच्या दिशेने वेगाने घसरू लागली बस तशीच मागे घसरली तर बस मध्ये प्रवाशांसह बसच्या मागे असणाऱ्या इतर वाहन चालकांच्या जीवाला धोका होता, याची जाण अनुभवी चालक असलेले दिलीप इंगळे यांना होती. त्यांनी तातडीने आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बाजूला खोदलेल्या नाल्यात बास उतरवली. छोट्या नाल्यात बस फसल्याने बस जागेवर थांबली आणि चालक वाहक व साऱ्याच प्रवाशांचा जीव वाचला. या बस मध्ये आधीच तांत्रिक बिघाड होता. असे सूत्रांनी सांगितले त्यामुळे चिखली आगारात ही बस धक्का देऊन सुरू करण्यात आली होती.तांत्रिक बिघाड असलेली बस प्रवासांच्या सेवेसाठी दिलीच कशी? आधी त्याची दुरुस्ती झाली नाही का ? झाली असेल तर त्यात हलगर्जीपणा झाला का ! असे प्रश्न उपस्थित होत आहेत आज थोडक्यावर भागले म्हणून ठीक पण दुर्दैवाने काही वाईट घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्या बसमधील प्रवाशांनी उपस्थित केला.

Post a Comment

Previous Post Next Post