Hanuman Sena News

शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर कडून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

  नांदुरा:'योग' हा आपल्या आपल्या निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. निरोगी स्वास्थ्य हे कोरोना सारख्या महामारीवर सुद्धा सहज मात करू शकते. आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे.आपल्या दैनंदिन जीवनामधील योगाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता आज बुधवार दि. २१ जून २०२३ म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय योग दिन 'शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडीकडुन वेगवेगळ्या प्रभागामध्ये साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सरिता ताई बावस्कार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. महिलांचे आरोग्य निरोगी असणे ही काळाची गरज असुन प्रत्येकानेच आपल्या निरोगी आरोग्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे.  शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख सौ.प्रज्ञा ताई तांदळे यांनी 'योगा' बद्दल लाख मोलाची माहिती सांगितली. महिला आपल्या दैनंदिन धाकाधकीच्या व्यस्त जीवनशैलीमधून स्वतःच्या आरोग्याला नेहमीच दुय्यम स्थान देतात.योगा हाच सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. योगा प्रात्यक्षिके करून दाखविली यासोबतच महिलांच्या आरोग्याविषयीच्या समस्या लक्षात घेऊन त्या संबंधीचे योग प्रात्याक्षिके करून दाखविली. उपस्थित सर्व स्त्रियांनी दररोज योगा करण्याचे आश्वासन दिले.शिवसेना महिला आघाडीकडुन सर्व महिलांना योग दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या विजया गोरे,मंगला सपकाळ, वाकूळकरताई,लक्ष्मी वसाने, सुनिता हिंगणकार,सुनिता इंगळे, जयश्री दळवी, वानखडेताई,राधा इंगळे,विमल तांदळे, जया इंगळे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post