चिखली: जिल्ह्यातील 'अ' वर्ग दर्जाचे पोलीस ठाणे असूनही चिखलीला गेल्या काही महिन्यापासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही त्यामुळे शहरात गुंडगिरी चोर्या आणि छेडखानीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी ठाणेदार देण्यात यावा या मागणीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या नेतृत्वात 20 जून ला चिखली पोलीस ठाण्यासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी इशारा दिला होता. त्यानुसार पाच दिवसात नवीन कायमस्वरूपी ठाणेदार न मिळाल्याने शेकडो शिवसैनिकांनी आज कपिल खेडेकरांच्या नेतृत्वात चिखली पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांनी ठेचा भाकर खाल्ली चिखली शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. कायद्याचा धाक राहिला नाही त्यामुळे आणि कायमस्वरूपी ठाणेदार चिखलीला ताबडतोब मिळाला पाहिजे असे कपिल खेडेकर यांनी यावेळी म्हटले. पोलीस स्टेशन प्रभारी सारंग नवलकार यांच्याशी शिवसेना नेत्यांनी चर्चा केली.यावेळी शिवसेनेची मागणी आपण पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहोचवू ठाणेदार देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक घेतील असे सारंग नवलकार म्हणाले. कायमस्वरूपी ठाणेदार द्यायला एवढा विलंब का होतोय अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्याबद्दल मला सांगता येणार नाही तो माझा अधिकार क्षेत्रातील विषय नाही असे प्रभारी ठाणेदार सारंग नवलकार म्हणाले. या आंदोलनात कपिल खेडेकरांसह युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, तालुकाप्रमुख किसन धोंडगे, रवी पेठकर, मंगेश इंगळे, दत्ता देशमुख, दत्ता सुसर, संतोष बापू देशमुख, शैलेश डोणगावकर, प्रलय खरात, गजानन पवार ,शेख साजिद, शेख बबलू ,गजानन कुटे,हरी इंगळे ,सतनामसिंग वधवा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखली शहराला कायमस्वरूपी ठाणेदार मिळावा ; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठेचा भाकर आंदोलन...
Hanuman Sena News
0
Post a Comment