बुलढाणा: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे .आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत याची दक्षता घ्या अशा धंद्यांचे समुळ उच्चाटन करा,असे सांगतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई झाल्यास बीट अधिकारी व अंमलदारास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. 'गंदा है पर धंदा है ये' म्हणून सुरू असलेल्या अवैध व्यवसायाच्या गाशा गुंडाळण्याची चिन्हे पोलीस अधीक्षकांच्या या निर्देशानुसार दिसून येत आहे. जिल्ह्यात सट्टा, मटका जुगार,चक्रीसह अन्य अवैध धंदे जोमात सुरू असल्याची ओरड होत आहे. अनेक ठिकाणच्या नागरिकांनी अवैध धंद्यांना विरोध करत पोलीस स्टेशन सह पोलीस अधीक्षकांपर्यंत यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या मात्र काही फरक पडला नाही. शहरातील कानाकोपरात सट्टा व मटका व्यवसाय करणाऱ्यांची कमाई नोकरदारापेक्षा अधिक असते. त्यामुळे कमी कालावधीत अवैध धंद्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा होते. या व्यवसायावर पोलीस प्रशासनाची मेहर नजर असल्याने गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही होत नाही. याची जाणीव असल्याने अवैध धंदेवाले घाबरत नाहीत. हे आजवरचे चित्र असल्याचे लोक बोलत आहेत. अनेकांच्या संसाराची राग रंगोळी झालेली आहे. एवढे होऊनही पोलीस प्रशासनाकडून अशा धंद्यावर ठोस कारवाई केली जात नाही. दरम्यान नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अवैध धंदे बंद म्हणजे बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी तसेच सक्त आदेश पोलीस ठाण्यात जारी केले आहेत. पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे फर्मान काडासने यांनी सोडले आहे.
अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा...
Hanuman Sena News
0
Post a Comment