Hanuman Sena News

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे जाहीर निषेध!


मलकापूर येथे दि 30/05/23 रोजी जनता कला वाणिज्य महाविद्यालयात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम सर्व पातळीवर अयशस्वी ठरला असून मलकापूर येथे ईतर अपंग संघटना असून दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन ही सुद्धा दिव्यांगांसाठी काम करनाऱी संघटना आहे नगर परिषद व महसूल प्रशासनाने ईतर संघटनेलाच विश्वासात घेवून कार्यक्रम राबविला जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी ज्या लोकांना रेशनकार्ड वाटप झाले त्यांनाच पुन्हा अंतोदय राशन कार्ड देण्यात आले तसेच मोजक्याच दिव्यांगांना ५℅ निधीचे वाटप करण्यात आले इतरांना केव्हा वाटप करनार याचा खुलासा करण्यात आला नाही नगर परिषद च्या वाटप झालेल्या चेकवर मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी नाही ज्या दिव्यांगांकडे मोटरसायकल आहे त्यांना सायकल वाटप करण्यात आली खरे लाभार्थी वंचितच राहिले या सर्व बाबींचा दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे जाहीर निषेध करण्यात येवून यापुढे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन ला प्रशासनाकडून डावलण्यात आल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी. दिव्यांग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, महा,सल्लागार पंकज मोरे, जिल्हा महासचिव राजीव रोडे,महासचिव संतोष गणगे, सदस्य अंकित नेमाडे, निलेश अढाव,विवेक राजापुरे,किशोर केणे, गजानन घोंगे, गणेश जाधव, रामेश्वर गारमोडे, निलकंठ वाकोडे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post