Hanuman Sena News

मलकापूरात दुचाकी, तीन चाकी वाहनांची धरपकड मोहीम राबविण्यात आली...

मलकापूर: शहरातून सुसाट वेग, कागदपत्रांची उणीव अशा वेगवेगळ्या कारणांवरून मलकापुरात पोलिसांनी दुचाकी व चार चाकी वाहनांची धरपकड केले.त्या वाहनांना पोलीस ठाण्यात जमा करून दंड ठोठावण्यात आल्याने सोमवारी सायंकाळी वाहन धारकांमध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसापासून शहरात सुसाट वेगाने दुचाकी धावत आहेत. ट्रिपल सीट, दुचाकी नियम धाब्यावर बसवून धावत आहेत. तर कागदपत्रांची उणीव असलेल्या तीन चाकी वाहने प्रामुख्याने ऑटोरिक्षा शहरात धावत आहेत. त्यामुळे ही वाहने पोलिसांच्या रडावर आली असल्याचे दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखीसाहेब यांच्या मार्गदर्शनात शहरातील मुख्य असलेल्या तहसील चौक व हनुमान चौक येथे दुचाकी व तीन चाकी वाहनांची धरपकड मोहीम राबविण्यात आली या कारवाईत पोलिसांनी शहरातील 50 दुचाकी व आठ ते दहा तीन चाकी ऑटो रिक्षा पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी जमा केल्या. त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रांची तपासणी करून दंड ठोठावण्यात आला.शहरात वाहने चालवताना वाहनधारकांनी नियम पाळावे पण काही दिवसापासून तसे होताना दिसत नाही. त्यामुळे रहदारीत अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुचाकी व तीन चाकी वाहनांची धरपकड करण्यात आली असे मलकापूर शहराचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post