Hanuman Sena News

बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटना पी.एफ.आय शी करणाऱ्या कर्नाटक काँग्रेस सरकारचे मोताळा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे जाहीर निषेध...







मोताळा : मा.राष्ट्रपती महोदया,भारत सरकार नवी दिल्ली यांना व मोताळा तहसील अधिकारी साहेब यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मोताळा यांच्या हस्ते एक निवेदन  दि 31 /५/२०२३ बुधवार रोजी देण्यात आले कॉंग्रेस पक्षाच्या कर्नाटक निवडणूक घोषणापत्रकात सदैव राष्ट्रास समर्पित असलेल्या बजरंगदल ची तुलना राष्ट्रद्रोही संघटना पी. एफ. आय सोबत करण्याचे घानेरडे कृत्य केले तसेच निवडून आल्यास बजरंगदल या संघटनेवर बंदी आनु अशी घोषणा  करणाऱ्या कर्नाटक  कॉंग्रस पक्षाच्या निषेधार्थ प्रदर्शने बुलढाना जिल्हा मधील प्रत्येक तालुक्यामध्ये केले आहे तहसील अधिकारी  साहेब मोताळा यांच्या मार्फ़त राष्ट्रपती महोदया यांना दिलेल्या निवेदनात  नमूद केले आहे की कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना बजरंग दल या प्रखर देशभक्त संघटनेची तुलना कुख्यात देशद्रोही दहशतवादी आणि बंदी घातलेल्या संघटनेशी केली, है अत्यंत दुर्दैवी आहे.विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी समर्पित आहे.त्याच वेळी, संपूर्ण जग पी.एफ.आय च्या क्रियाकलापांशी परिचित आहे.जिथे जिथे PFI चे लोक डोके सोडून एक टोळी बनून उभे होते.आणि कॉग्रेसच्या सरकारानी त्यांना पाठिबा दिला. तिथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दहशत संपवण्यासाठी लोकशाही पद्धती वापरण्यास सुरुवात केली. कॉंग्रेस आणि पी एफ आय यांची ज्या प्रकारे युती झाली आहे, ते स्वाभाविक आहे. या सर्व गोष्टीमुळे बजरंग दल काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. सोनिया गांधी देशातील जनतेची फसवणूक करू शकत नाहीत! कॉग्रेस बजरंग दलाला चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तो देशातील जनता मान्य करणार नाही. बजरंग दलाचा प्रत्येक कार्यकर्ता हे आवाहन म्हणून घेत आहे.बजरंग दल राजकारण करत नाही. पण काँग्रेस आम्हाला राजकारणात ओढु इच्छित असाल तर आम्ही काँग्रेसला त्या क्षेत्रातही उत्तर देऊ इच्छितो काँग्रेसच्या चुकीच्या योजना कोणत्याही प्रकारे पूर्ण होऊ देणार नाही. बजरंग दलावर बंदी घालण्याची काँग्रेसची चर्चा आहे. त्यावेळी संसदेच्या आत सीमी संघटनावर बंदीला काँग्रेसने विरोध केला होता.याचा विसर काँग्रेसला पडला सिमीसंघटना सारख्या देशद्रोही संघटनेच्या  विरोध करताना याच लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले काँग्रेस बजरंग दल बद्दल बोलत असताना काँग्रेसचा छुपा हिंदूविरोधी अजेंडा समोर आला आहे. बजरंग दल आणि देशातील जनतेने हे आव्हान स्वीकारले असून त्याला प्रत्येक लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल सदर निषेध दर्शवण्याकरिता व निवेदन देण्याकरिता जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रमोद भाऊ जोशी, प्रखंड सह गौरक्षा प्रमुख योगेश चव्हाण, कृष्णा बाजोडे, रवी पाटील, नितीन देशमुख, गोपाल राजगुरे दिलीप देवकर, राहुल गुंजकर, अजय डुकरे ,ज्ञानेश्वर गुंजकर, रामदास हटकर, महादेव गुंजकर, अविनाश राठोड ई बजरंग दल कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post