मलकापूर : मलकापूर तालुक्यातील वाघोळा येथील स्वप्निल अशोक पाचपोळ याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. गरीब कुटुंबातील स्वप्निल याने हे यश संपादन केल्याने कुटुंबासाठी तसेच गावकऱ्यांसाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निवडीनंतर स्वप्निल याचे वाघोळा सह पूर्ण जिल्हाभरातुन त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.मलकापुर तालुक्यात असलेलं वाघोळा हे छोटसं गाव या गावात अशोक पाचपोळ पिढ्या पिढ्या शेतीचा व्यवसाय करतात. घरातील कोणीही कधीच अभ्यासात जास्त रस दाखवला नाही. सगळेच शेतीचा व्यवसाय करत आले. अशोक पाचपोळ यांना तिनं मुलं त्यात मोठा मुलगा देखील शिक्षण घेत आहे लहान मुलगा स्वप्निल शिक्षणात हुशार मात्र शिक्षण झाल्यानंतर नेमकं करायचं काय असा प्रश्न स्वप्निल ला पडला होता काही दिवसात कोणीतरी स्वप्निल ला सांगितलं की मुंबई पोलीस दलात भरती निघाली आहे. आई-वडिलांचे व काहीतरी वेगळा करण्याची इच्छा असलेला स्वप्निल यांनी भरतीची तयारी सुरू केली सकाळी चार वाजल्यापासून सराव करायचं काही दिवसांनी पोलीस दलातील परीक्षांचा फॉर्म भरून त्यांनी परीक्षा दिली. आणि त्यात त्याची निवड देखील झाली या निवडीनंतर अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आता पोलीस दलात भरती झाल्याने देश सेवेसाठी जाणार असल्याने गावकऱ्यासह जिल्हाभरात त्याच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. त्या आनंदात गावकऱ्यांनी एकत्र येत स्वप्नीलच्या यशाबद्दल गावात चक्क मिरवणूक काढली व त्याचा सत्कार केला यावेळी गावातील सामाजिक संघटना हनुमान सेनेचे शाखा अध्यक्ष अमोल मोरे यांनी त्याला शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्याचा यशाचा कौतुक केले या यशानंतर आपली परिस्थिती काहीही असो जर मनात निश्चय केला एखादी गोष्ट मिळवायची तर आपण ती मिळवू शकतो हे स्वप्निलने करून दाखवले.यावेळी रोहित कांडेलकर, ऋतुराज सोनवणे, आकाश धाडे, ऋषिकेश मोरे, रितेश कहाते, श्याम काळे, आदित्य लष्करे, ऋषिकेश कांडेलकर, गणेश कांडेलकर, ईश्वर निशाणकर, वैभव कांडेलकर, गौरव घाईट, निलेश काटकर, सुमित घुंगरे, प्रतिक अमृतकर, ज्ञानेश्वर घुंगरे, सुमित पुरकर,अभिशेक भिसे ई हनुमान सेनेचे कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
पोराने बापाच्या कष्टाचं चीज केलं; संकटांवर मात करत मुंबई पोलीस दलात दाखल...
Hanuman Sena News
0
Post a Comment