Hanuman Sena News

शरद पवारांचं राजीनामा नाट्य कशासाठी ? भाजपाच्या गौप्यस्फोटाने खळबळ ...








मुंबई :  भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यावरून त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचे होते की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा राष्ट्रवादीत घडल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांची नक्कीच वाताहत झाली असती म्हणून ते रडत होते. अजूनही पडद्यामागे त्यांची वाताहत सुरू असल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे.दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील शनिवारी झालेल्या सभेवरून जोरदार टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना सैनिकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह समर्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते तीच ती कॅसेट लावत आहेत.  ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसत आहेत, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post