बुलढाणा : तनिष्क हा छोटासा चिमुकला. पण, त्याला थरारक अनुभव घेण्याची सवय लागली. तो स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त करत गेला. त्याला साथ मिळाली ती त्याच्या वडिलांची. वडिलांना त्याला नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे तनिष्कच्या इच्छा, आकांशा वाढत होत्या. एक दिवस तर त्याने कळसुबाई शिखर सर करण्याची इच्छा आपल्या वडिलांना बोलून दाखवली. या चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी नेहमीप्रमाणे प्रोत्साहित केले. त्यासाठी त्याला तयार केले. त्यामुळे तो आठ वर्षांचा असताना हा मोठा विक्रम करू शकला. यामुळे तनिष्कचे आता सर्वत्र स्वागत केले जात आहे.चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक परिश्रम आणि जिद्दीपुढे उंच आकाशही ठेंगणे होते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय बुलडाणा शहरातील एका चिमुकल्याने आणून दिलाय. तनिष्क माधव देशमुख या चिमुकल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच समजले जाणारे कळसुबाई हे शिखर यशस्वीपणे सर केले आहे. यामुळे चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.तनिष्क माधव देशमुख हा बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत आहे. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेतली. 1 मे रोजी कळसुबाई शिखर सर करण्याबाबत निर्धार केला. ही गोष्ट त्याने वडील माधव यांच्याकडे बोलून दाखवली.
आठ वर्षाच्या चिमुकल्याने केला कळसुबाई शिखर चढण्याचा विक्रम...
Hanuman Sena News
0
Post a Comment