Hanuman Sena News

कुटुंब झोपले असतांना चोरट्याने साधला डाव...








खामगाव -  स्थानिक शिक्षक कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचांदीच्या मौल्यवान दागीणे असा एकुण एक लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने तपासाची चक्रे फिरवित एका संयशीतास ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी शहर पोलीसांत दाखल तक्रारीनुसार, खामगाव शहरातील शिक्षक कॉलनीत सुरक्षा रक्षक असलेल्या शिवचरण जयराम सरदार यांचे घर आहे. या घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटाचा दरवाजा तोडून रोख ४५ हजार, ६३ हजार रूपये किंमतीची गहू पोथ, पेंडाल, सोन्याची पोथ असा एकुण एक लाख १८ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शहर पाेलीसांनी शिवचरण सरदार यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.एका संशयीतास अटकघटनास्थळी डॉग पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली असून एका संशयीत इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. चेतन कळसकार वय २२ रा. हरिफैल असे संयशीताचे नाव आहे. घटनास्थळी गेटवर चोरट्याने सिगारेट पिल्यानंतर फेकलेले तुकडा आढळून आले आहे. या आधारे पोलीस पुढील सुगावा लावत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post