Hanuman Sena News

साप्ताहिक शिवआरती ग्रुप कडुन स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती उत्साहात साजरी...

नांदुरा: कवी, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, नाटककार, विचारवंत, निबंधकार. लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास. त्यातूनच मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा करणारे 'स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर.. एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे क्रांतीसुर्य म्हणजे सावरकर .. स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे सावरकर..ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे इतिहासातील सुवर्णपान आहे.  वयाच्या ११ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहणारे पहिले क्रांतीवीर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आज या महान तत्वज्ञानी बलिदानी सावरकरांची जयंती.आज रविवार दि. २८/०५/२०२३ म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिनासोबतच साप्ताहिक शिवआरतीचा १०६ वा आठवडा साप्ताहिक शिवआरती ग्रुप कडुन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ सरिताताई बावस्कार यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार युवा पिढी सोबत सर्वांनी आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे असे सांगून उपस्थित सावरकर, शिव प्रेमींचे आभार मानले. जितु मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, वेदांत वाणी व विशाल इंगळे यांनी वीर सावरकर यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकला. सर्व उपस्थित शिवभक्तांनी क्रांतिवीर सावरकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या त्यागाचे स्मरण केले. कुठलेही श्रेय,मान,सम्मान न घेता केवळ त्याग हेच आयुष्य मानून  झटत राहणारे थोर क्रांतिवीर सावरकरांचे क्रांतीचे वादळ  १९६६ मध्ये शमले असले तरी हे मात्र सावरकर हे झंझावात सगळ्यांच्या मनात कायम जिवंत राहील आणि युवावर्ग आणि अवघ्या विश्वाला हे महान चरित्र सदैव प्रेरणा देत राहील व सावरकर यांच्या तत्व आपल्या जीवनात रुजविण्याचा संकल्प उपस्थित सर्व शिवप्रेमींनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post