मलकापूर: शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने 50 लाखांचा खर्च करण्यासंबंधीचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळांनी घेतला. नवनिर्वाचित समितीची बैठक गुरुवारी पार पडली.त्यात खाते बदलाच्या ठरावासह महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. या बैठकीत 18 पैकी 17 जण उपस्थित होते. हे विशेष मलकापूर बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळांची बैठक गुरुवारी पार पडली. सभापती शिवचंद्रजी तायडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती नागोजी राणे व सचिव राधेश्याम शर्मा व सर्व संचालक प्रामुख्याने उपस्थित होते.बाजार समितीच्या जुन्या यार्डातील जमिनीची लीज पुन्हा नावावर करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची पत्रव्यवहार करण्यासंबंधी एक मत झाले. तर मावळत्या प्रशासनाच्या काळात न्यायालयाने स्थगनादेश दिलेल्या 2.25 कोटी रुपयांच्या कामांना रद्द करण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला जुन्या कार्यालयाची दुरुस्ती त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने 50 लाखांच्या खर्चासाठी एकमताने निर्णय घेण्यात आला. बाजार समितीने विकास कामासाठी सुमारे 28 कोटी कर्ज उचलले होते त्यापैकी तब्बल 21 कोटीचा भरणा झालेला आहे. उर्वरित सात कोटीची माफी शासनाकडून करून आणण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. पुन्हा नव्या जोमाने शेतकरी हितासाठी निर्णय घेतले जातील असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शिवचंद्र तायडे यांनी सांगितले.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास रथ जोमाने पुढे नेणार - नवनिर्वाचित सभापती शिवचंद्रजी तायडे
Hanuman Sena News
0
Post a Comment