जिल्ह्यात अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचे ठरत असून पालकाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गत चार महिन्यात २३० अल्पवयीन मुलीसह महिलाही गायब झाल्या आहेत. प्रेम प्रकरण व घरगुती वादातून मुली पळून गेल्या असून मुली पळून जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालक चिंताग्रस्त आहेत. सोळावं वरीस धोक्याचं असतं असे म्हणतात. या वयात मुले बाल्यावस्थेतून किशोर अवस्थेत येतात. त्यांचे विचार व राहणीमानात बदल होत असतो. त्यातूनच स्वतःचे स्वच्छंद जीवन जगण्याचे स्वप्न मनाशी वाढवून मुले मुली पळून जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुलीचा समावेश असून जानेवारी ते 18 मे या साडेचार महिन्यात 230 महिला व मुली गायब झाल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवर चार महिन्यात कारवाई न झाल्यास पुन्हा अमानवी वाहतूक विभागाकडे पाठविण्यात येतो या विभागाकडून मुलीचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते. जिल्ह्यात अनेक लेकरांच्या मायही गायब झाले आहेत. चार महिन्यात 230 मुली व महिला गायब झाले आहेत त्यामध्ये अनेक महिला या 20 ते 25 वयोगटातील आणि महिला 30 ते 40 वयोगटातील गायब झाल्याचे दिसून येते. अल्पवयीन मुली मुले पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मिसिंग दाखल झाल्यानंतर पोलीस तपास घेतोच परत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोळावं वरीस धोक्याचं; बुलढाणा जिल्ह्यात 230 अल्पवयीन मुलीसह महिला गायब...
Hanuman Sena News
0
Post a Comment