Hanuman Sena News

अवैध मुरूम खोदकाम प्रकरणी जेसीबीसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त...


मोताळा: सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तोडलेल्या वृक्षांची अत्यंत सोप्या पद्धतीने विल्हेवाट देखील लावली जात आहे. तसेच वन विभागाच्या अधिकारांच्या नाकावर टिचून रेती, मुरूम, गौण खनिजांची देखील मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक केली जात आहे दरम्यान शुक्रवारी 12 मे रोजी वन विभागाच्या तीन कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या धडाकेबाज कारवाई करत पश्चिम कोथळी बिट क्र. 487 मध्ये मुरूम खोदकाम करताना जेसीबीसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैधरीत्या मुरूम खोदकाम करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. मोताळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत जवळपास मोताळा ,मलकापूर, नांदुरा तसेच खामगाव तालुक्यातील अनेक गावे येतात रोहिणखेड व राजुर बीट सर्वात मोठी मलीदा देणारी आहे. या बीटमध्ये मोठी कमाई असल्याची चर्चा असून येथून मोठ्या प्रमाणात वन अधिकाऱ्यांच्या नाकावर टिपून वन विभागातील गौण खजिनांची चोरी होत असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी 12 मे रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा (प्रादेशिक) अंतर्गत पश्चिम कोथळी बिट कक्ष क्र. 487 मध्ये अवैधरित्या मुरूम खोदकाम प्रकरणी मुख्य वनरक्षक अमरावती, उपवनसंरक्षक बुलढाणा व सहाय्यक वनरक्षक व कॅम्प बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पालघर धरणामध्ये एम एच 28 ए झेड 7594 क्रमांकाच्या जेसीबीद्वारे मुरूमाचे अवैध खोदकाम केले जात असल्याचे दिसून आले. सदर जेसीबी जप्त करण्यात आले असून याप्रकरणी कृष्णा जवानसिंग कटारे (वय 25) रा.तरोडा तालुका मोताळा यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post