Hanuman Sena News

शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी 2 योजना मंजूर...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. शिंदे फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली असून यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.  शेतकऱ्यांसाठी दोन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यात नमो शेतकरी महासन्मान योजना आणि शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा अशा दोन योजनांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.राज्याच्या  मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपयांचा निधी देते.त्याच धर्तीवर राज्य सरकारही 6000 रुपये निधी देणार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण बारा हजारांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारचा ही लाभ मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post