Hanuman Sena News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात 10 वर्षे सक्त मजुरी आणि 25000 रुपये दंडाची शिक्षा....





मलकापूर: अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरणात आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याची सजा देण्याचा आदेश दिनांक 11 मे 2023 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पी. आर.कदम मलकापूर यांनी दिला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की आरोपीचेच गावात राहणारी अल्पवयीन मुलगी तिचे घरी एकटी असताना आरोपी शेख युसुफ शेख आयुब याने लग्नाचे आम्हीच दाखवून त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. व सदरची घटना कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांना कळले असता त्यांनी मुली सोबत घेऊन पोलीस स्टेशन नांदुरा येथे दिलेल्या रिपोर्ट वरून गुन्हा रजि नं. 344/2018 नुसार भा.द.वि.चे कलम 376 376 (2)(1) (एन) 417 तसेच 506 सहवाचनीय बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को अॅक्ट) कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदरचे गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक श्री डी. डी. राजपूत तसेच गौतम इंगळे पोलीस स्टेशन नांदुरा यांनी करून तपासाती दोषारोपपत्र वि. सत्र न्यायालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते. सदरचे प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊन पिडीत मुलगी व तसेच इतर साक्षीदार व तपास अधिकारी असे एकूण 13 साक्षीदार सरकार पक्षातर्फे विवेक मा. बापट सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी तपासलेत्यांचे पुराव्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सदरचे प्रकरणात अंतिम युक्तीवाद होऊन सरकार पक्षातर्फे विवेक मा. बापट सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस भां. दं. वि. चे कलम 376 (2) (1 ) नुसार दहा वर्ष सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच भा.द.वि.चे कलम 417 नुसार एक वर्ष सक्त मजुरी व दंड रुपये 1000 व दंड न भरल्यास पंधरा दिवस करावास देण्याचा आदेश दिनांक 11 मे 2023 रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पी.आर.कदम मलकापूर यांनी दिला आहे. सदरचे प्रकरणात पैरवी अधिकारी श्री कडू बोरसे यांनी पैरवी म्हणून काम केले. आरोपीस भां.द.वि. कलमांतर्गत शिक्षा घोषित केल्याने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को अॅक्ट) कलम 4 व 6 नुसार वेगळी शिक्षा देण्यात आलेली नसून दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post