खामगाव : जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आयपीएल जुगाराच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते तोच, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील आयपीएलच्या जुगारावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. वडजी भेंडी येथील कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरात आयपीएलच्या जुगाराचे जाळे विणले गेल्याचे चित्र आहे.याबाबत पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडजी भेंडी शेत शिवारातील एका शेतात रामसिंग विलास पवार ३२ रा. वडजी भेंडी, अजय किसनदास बौरागी २१ रा. घाटपुरी नाका खामगाव, अक्षय गणेश जुनारे २४ रा. गोपालनगर खामगाव हे तिघे आयपीएलच्या सामन्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता तिन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आले. आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल, ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटाप, दुचाकी, पेन ड्राईव्ह आणि १५५० रुपये रोख रक्कमेसह १ लाख २२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ अन्वये कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल जंजाळ यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.बुकींचे ग्रामीण भागात बस्तान गत आठवड्यात जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारवाईनंतर रविवारी रात्री वडजी भेंडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली या दोन्ही कारवाईत खामगाव शहरासह नांदुरा शहरातील आरोपींचा समावेश आहे त्यामुळे खामगाव आणि नांदुरा शहरातील बुकिंग सुरक्षित ठिकाण म्हणून ग्रामीण भागात बस्तान बसवण्याची चर्चा आहे.
खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आयपीएलच्या जुगाराचे जाळे...
Hanuman Sena News
0
Post a Comment