विशेष प्रतिनिधी,
मलकापूर: वाघोळा येथील हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव निमित्त 301 दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठाण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच मंदिर पाण्याने धुऊन टाकण्यात आले.व संध्याकाळी मंदिरात दिवे लावून महाआरती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती वाघोळा येथील हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल मोरे हे उपस्थित होते तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष रोहित कांडेलकर तसेच संपर्कप्रमुख आकाश कहाते. यांनी बघितले तसेच हनुमान सेनेचे ऋतुराज सोनवणे ,युवा प्रमुख सुशील धाडे, आकाश धाडे, विठ्ठल सोनवणे, ऋषिकेश मोरे, रितेश कहाते, ज्ञानेश्वर पुरकर, सुमित घुगरे, श्याम काळे, आदित्य लष्करे,भागवत कांडेलकर, सुमित कहाते, शुभम मोरे, मंगेश थेरोकार, स्वप्निल पाचपोर, प्रेम घटे, उदय घाईट,रोशन कोळी, पवन कहाते, रामा कांडेलकर,अमोल पारधी, गणेश कांडेलकर,दीपक कहाते, गौरव काटोने, ई.हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment