मलकापूर :- मलकापूर आगारातून दररोज शेकडो बसेस तालुक्यातील खेडेगावात ये जा करीत असतात परंतु ह्या बसेस कुठे जात आहे याबबात बसला गावाची पाटी लावलेली दिसत नाही ही जबाबदारी बस चालकाची असते पन बस चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते परिणामी प्रवाश्यांना गाडी कुठे जात आहे काहीच कळत नाही प्रवासी नुसते विचारपुस करीत राहतात व यामुळे बरेचदा गाडी हुकते शाळकरी विद्यार्थी असो की वयस्कर लोक दिव्यांग ह्या सगळ्या ना ह्या अडचणी ला दररोज तोंड द्यावे लागते आहे एसटीचे वरीष्ठ अधिकऱ्यांना याबाबत कल्पना नाही हि बाब गंभीर आहे.या प्रवाश्यांच्या होनाऱ्या गैरसोयीकडे एसटी प्रशासनाने लक्ष वेधन्याकरीता आज दि १०/०४/२३ रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे मलकापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमुद केले आहे की, सर्व बसेस ला गावाच्या पाट्या लावाव्यात व ज्या ठिकाणी बसचा थांबा आहे त्या ठिकाणी वाहकाने कोणतेही कारण न सांगता बस प्रवाश्यांसाठी थांबवावी अन्यथा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे तिर्व आंदोलन करण्यात येईल याची एसटी प्रशासनाने नोंद घ्यावी.त्यावेळी उपस्थित दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष- निलेश बाळु चोपडे, प्रदेश सल्लागार - पंकज मोरे, जिल्हाध्यक्ष- नागेश सुरंगे,नांदुरा तालुकाध्यक्ष- प्रकाश चोपडे, अंकित नेमाडे, संतोष बोरले, संतोष गणगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर एसटी आगाराचा भोंगळ कारभार, गावाची पाटी न लावता चालवता आहेत बसेस, प्रवाश्यांचे हाल!
Hanuman Sena News
0
Post a Comment