बुलढाणा : आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने बऱ्याच पालकांचा याकडे कल असतो. यासाठी प्रक्रिया राबवत असताना काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. संबंधित तारखेला काही काम न झाल्यास पुढील तारखांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घोळामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पहिल्या वर्गात तब्बल 25% प्रवेश मोफत दिल्या जात असतात. राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत RTE ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 12 एप्रिलला या प्रवेश प्रक्रियेतील पहिली निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती.निवड यादी जाहीर झालीच नाही मात्र RTE प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद पडली असल्याने ही निवड यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडले आहेत.आरटीई च्या 25% प्रवेश क्रियेत 12 तारखेपासून 25 तारखेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे मात्र वेबसाईट चालत नसल्याने ही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी जाहीर झालीच नाही वेबसाईटचे मेंटेनन्स चे काम सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा गोंधळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील खाजगी शाळेत आर टी ई अंतर्गत पहिल्या वर्गातील प्रवेश रखडले आर टी इ प्रवेश प्रक्रिया वेबसाईट हँग झाली आहे 12 एप्रिलला निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती पण अद्याप असे काही झाले नाही यामुळे शिक्षण विभागाचा गोंधळ कारभार चव्हाट्यवर आपला आहे. मेंटेनन्सचे काम सुरू असल्याची माहिती बुलढाणा शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली पण यामुळे पालकांच्या जीवात जीव नाही वेळेवर सर्व झालं नाही तर आपल्या मुलांना मोफत प्रवेश मिळेल की नाही अशी भीती त्यांना वाटत आहे.
आरटीईतील पहिलीचे प्रवेश रखडले; १२ एप्रिलला जाहीर होणार होती यादी पण,…
Hanuman Sena News
0
Post a Comment