Hanuman Sena News

शिंदेंच्या शिवसेनेने केलेले आरोप रविकांत तुपकर यांनी फेटाळले...









चिखली: 15 एप्रिल ला चिखलीत शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन रविकांत तुपकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या चिखलीच्या गाडे व्यापारांचे वकीलपत्र रविकांत तुपकर यांच्या पत्नीने घेतल्याचे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते. दरम्यान आज १७ एप्रिलला रविकांत तुपकरांनी चिखली येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर केलेल्या आरोप फेटाळून लावले. शिंदे गटाने घेतलेली ती पत्रकार परिषद शेतकऱ्यांसाठी नव्हतीच तर रविकांत तुपकरांना टारगेट करण्यासाठी होती. ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले त्यांची लायकी आधी त्यांनी तपासायला पाहिजे होती असे रविकांत तुपकर म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्यावर देखील तुपकरांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही खासदार आमदार आहात प्रश्नांना उत्तरे द्यायची जबाबदारी तुमचीच आहे असे तुपकर यावेळी म्हणाले. चिखलीच्या गाडे व आणखी एका अशा तिघांनी शेतकऱ्यांची खोटावधी रुपयांची फसवणूक केली जेव्हा शेतकऱ्यांनी ही बाब मला सांगितली त्या दिवसापासून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून व्यापाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि त्यानंतर लगेच दीड तासात गुन्हा दाखल झाला. असे असले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी तुपकर यांनी केली. अलीकडच्या दोन पाच वर्षात अधिक भावाचे आमिश दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भातील कायदाच तकलादू असल्यामुळे गुन्हेगारांना अभय आणि शेतकऱ्यांना भय अशी परिस्थिती आहे. आधीच अतिवृष्टी अवकाळी  पाऊस यामुळे शेतकरी संकटात आहे. शेतीमालाला भाव नाही यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना काय शिक्षा करायची ती करा. मात्र पिढीत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे तत्काळ मिळाले पाहिजेत असे तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड शर्वरी तुपकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाढे बंधूंचे वकीलपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आला होता यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की माझे सासरे एडवोकेट सावजी यांच्याकडे पंधरा ते वीस वकील प्रॅक्टिस करतात त्यात शर्वरी तुपकर देखील आहेत. गाढे यांचे सासरे चव्हाण हे एडवोकेट सावजी यांच्याकडे काही वर्षे कारकुन म्हणून काम पाहत होते. त्या ओळखीतून ती केस त्यांच्याकडे आली होती. प्रथमदर्शी हा व्यापारी-व्यापारातील व्यावसायिक विषय असल्याने त्यांना वाटले. मात्र दुसऱ्या दिवशी याबाबतीत खरे काय ते आपल्याला कळल्याने एडवोकेट सावजी यांना आपण ती केस घेऊ नका अशी विनंती केली. आता संबंधित केस एडवोकेट व्हि. एन. इंगळे यांच्याकडे असल्याचे तुपकरांनी सांगितले. एडवोकेट सावजी यांच्याकडे जाणारा पक्षकार मला विचारून जात नाही, तो त्यांच्या स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तुम्हाला मला टार्गेट करायचे की शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यायचे हे आधी सांगा मला टार्गेट करायला आयुष्य पडलेय असे तुपकर यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post