Hanuman Sena News

बुलढाणा अर्बनच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न फसला; टुनकी येथील घटना...









संग्रामपूर (बुलढाणा) : अज्ञात दरोडेखोरांनी बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेवर २६ एप्रिल रोजी रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आधुनिक पद्धतीचे आपत्कालीन सायरन वाजल्याने रोकड चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. सायरनचा आवाज होताच रोकड चोरी न करता अज्ञात दरोडेखोर घटना स्थळावरून पसार झाले.रात्री तीन, साडे तीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टुनकी येथे रात्रीच्या वेळी भरवस्तीतील बुलढाणा अर्बनच्या शाखेबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलवून शटरची कडी तोडली. त्यातील एकाने आतमध्ये रोकड चोरण्यासाठी प्रवेश केला. मात्र आधुनिक सेंसर सायरन वाजल्याने शाखेत दरोड्याचा प्रयत्न फसला. सायरनचा आवाज होताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. शाखेत आतमध्ये प्रवेश केलेल्या एका दरोडेखोराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपले. मात्र चेहऱ्यावर रुमाल (स्कार्फ) बांधून असल्याचे दिसून आले.दरम्यान, माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सागर भास्कर, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर तातडीने दखल झाले. सोनाळा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सूरू केली आहे. टुनकी शाखेचे व्यवस्थापक मनोज गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोर विरूद्ध कलम ४५७, ३८०, ५११ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सागर भास्कर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post