मलकापूर: बुधवार दि.5/4/2023 रोजी मलकापूर येथील लि भो चांडक विद्यालय सायंकाळी 5 वाजता वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षाकडून होत असलेला अपमान बघता जनतेला विर सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी 30 मार्चपासून राज्यातील 288 मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली वेगवेगळ्या विभागासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून या गौरव यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचेच औचित्य साधून बुधवारी मलकापूर येथे वीर सावरकर गौरव यात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. सावरकरांचा रथ या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तसेच कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेले महिला व पुरुष यांनी भगवी टोपी परिधान केलेली होती. यात्रेची सुरुवात ली.भो. चांडक ते नसवाला चौक, हनुमान चौक, सत्यम चौक, ली.भो.चांडक येथे यात्रेचे कार्यक्रस्वरूप निर्माण झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापुराचे लोकप्रिय लोकनेते मा.आ.चेनसुखजी संचेती, शिवसेना शहर अध्यक्ष किशोर भाऊ नवले, तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष विजयभाऊ साठे, विश्व हिंदू परिषदेचे संमती जैन हे उपस्थित होते .तसेच वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान शुक्ला सरांनी केले तसेच आभार डॉ. योगेशजी पटणी यांनी केले यावेळी भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान सेना, महिला आघाडी, महिला भजनी मंडळ , सर्व हिंदूवादी संघटना व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मलकापूर येथे संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment