मलकापूर : मलकापूर नगरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले राजकीय सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींनी भिमरायांना अभिवादन केले जय भीमच्या गगनभेदी घोषणांनी नगरी दणाणली क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी भीम नगरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोटार सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. मोटार सायकल रॅलीच्या माध्यमातून मलकापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. वेगवेगळ्या रस्त्यावरून संचलित रॅलीचा रेल्वे स्टेशननजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समारोप करण्यात आला. सायंकाळी भीम नगरातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे ऐतिहासिक लायब्ररी मैदानात जाहीर सभेत रूपांतर झाले त्या ठिकाणी मार्गदर्शन तर कार्यक्रमासह भीम गीतांचा प्रबोधन पर कार्यक्रम संपन्न झाला या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आमदार राजेश ऐकडे माजी आ.चेनसुख संचेती माजी नगराध्यक्ष एड. हरीश रावळ उपाध्यक्ष रशिदखा जमदार आदींसह विविध राजकीय तथा सामाजिक संघटना च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने समाज बांधवासह नागरिकांनी सहभाग घेतला यादरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाय, पोलीस निरीक्षक तावरे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
निळ्या आसमानात गुंजला 'जय भीम' चा नारा !
Hanuman Sena News
0
Post a Comment