मलकापूर : शिवसेना ऊ.बा.ठा. पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदूंचे आराध्य गौ माता तथा ब्राह्मण समाजाचे विधी परंपरेनुसार अविभाज्य असे शेंडी व जाणवं यांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज दि. २७ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे निषेध नोंदवीत उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, हिंदू धर्मानुसार 33 कोटी देवतांचे स्थान म्हणून गोमातेला मानण्यात येते. तसेच धार्मिक विधी परंपरेनुसार ब्राह्मणांसाठी शेंडी व जानवे हे अविभाज्य असे घटक आहेत. व या दोन्ही गोष्टींचा राजकीय विषयांशी कुठलाच संबंध येत नाही. असे असताना दि.२३/४/२०२३ रोजी शिवसेना उ. बा. ठा. या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणातून ब्राह्मण समाजाबद्दल "आम्हाला शेंडी जानव्याचे राजकारण मान्य नाही". व "गाय ही बैलाला जन्म देते ती त्यांची माता आहे आमची नाही "असे बेताल वक्तव्य केल्यामुळे समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावलेल्या गेल्या आहेत.आम्ही ब्राह्मण समाज धर्म, संस्कृतीचे जतन करणारे तथा शांततेचे पुरस्कर्ते आहोत. व त्यामुळे की काय सद्य स्थितीत विविध राजकीय पुढारी स्वतःच्या प्रसिद्धी पिपासुवृत्तीमुळे ब्राह्मण समाजाबद्दल नेहमीच अपशब्द वापरत असतात. ब्राह्मण समाजावर विनाकारण टिका, टिप्पणी करत असतात. आपल्या धार्मिकतेवर बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न करीत असतात. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचे पक्षाच्या कार्यक्रमात गौ माता तथा ब्राह्मण समाजावर चुकीच्या प्रकारे शब्दप्रयोग करीत कथित अनुदगार काढलेले आहे. हिंदू धर्माचे पुरस्कर्ते म्हणवणारे शिवसेना उ .बा.ठा. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या वक्तव्यामुळे हिंदू समाज तसेच संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्या अनुषंगाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करून उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी. अशी मागणी आपणा या निवेदन द्वारे करण्यात आली आहे.निवेदन देते वेळी, विश्व हिन्दू परिषद, बजरंगदल, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांचा आधी विविध समाज बंधू उपस्थित होते. राजकीय पोळ्या शेकण्याकरिता बेताल वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा सकल ब्राह्मण समाजा तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येउन ब्राह्मण समाजाबद्दल यापुढे कोणत्याही राजकीय पक्ष वा नेता यांनी आक्षेपार्ह विधान करू नये अन्यथा आम्हाला नाईलास्तव लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणे भाग होईल. यामुळे भविष्यात निर्माण होणा-या कायदा व सुवव्यस्थेच्या प्रश्नावर संबंधीत लोक जबाबदार राहतील. असा इशारा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा उपाध्यक्ष नरेश देशपांडे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ब्राह्मण महासंघातर्फे जाहीर निषेध...
Hanuman Sena News
0
Post a Comment