खामगाव: महाविद्यालयातून घराकडे निघालेल्या युवतीला अडवून विनयभंग करणाऱ्या टवाळखोर युवकास खामगाव येथील सत्र न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली. गुन्हा सिद्ध होताच न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावल.शहरातील एका विद्यार्थिनीला 10 मार्च 2015 रोजी महाविद्यालयातून घरी जात असताना आरोपी विक्की दादाराव वानखेडे (वय 23) याने तिला आवाज देऊन बोलावले हात धरून विनयभंग केला युतीने आरडा ओरड करताच नागरिक तिच्या मदतीला धावले. तेवढ्यात आरोपी विक्की पडून गेला. छेडछाडीच्या प्रकाराने संतापून पिढीत युतीने जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच न्यायालयातही न घाबरता घटनाक्रम पुराव्याद्वारे सांगितला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी आठ साक्षीदारांची पुरावे न्यायालयासमोर नोंदविले.सरकार पक्षाच्या सर्व साक्षीदारांचा पुरावा तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विक्की वानखेडे याला एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपासी अंमलदार जयपाल ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी म्हणून पो.हे.कॉ. चंद्रलेखा शिंदे यांनी काम पाहिले.
विनयभंग करणाऱ्या टवाळखोर युवकास एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली ...
Hanuman Sena News
0
Post a Comment