Hanuman Sena News

अक्षय तृतीया म्हणजे काय ? कारण तृतीया तर दर महिन्याला येते हो मग याच तृतीयेचे इतके महत्व का बर ?







  
 
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख मदन रत्न या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय तृतीया नाव पडले आहे. या दिवशी पितृतपर्ण करण्यास न जमल्यास निदान तिलतपर्ण तरी करावे असे आहे. उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री जोडा इत्यादी वस्तू दान द्यायच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करायचे असते. त्यानिमित्ताने स्त्रिया हळदी कुंकू करतात. अक्षय तृतीया या दिवशी काय खरेदी करावे हा धार्मिकांचा उत्सव सण आहे. या दिवशी दिलेल्या दान अगर केलेला जप,स्नान आधी कृत्यांचे फल अनंत असते. सर्वच अक्षय( नाश न पावणारे) होते. यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जव्हाहिर खरेदी करू शकतात. असे केल्याने त्यात सतत वाढ होत असते या दिवशी नवीन वस्त्रे शस्त्रे दागदागीने आधी वस्तू तयार करतात. अगर परिधान करतात तसेच नवीन जागा संस्था अगर मंडळे आधी यांचे स्थापना उद्घाटन वगैरे केली जातात. नवीन वाहन खरेदी केली जाते नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरू केले जातात थोडक्यात काय तर कोणतेही शुभ कर्म या दिवशी चालू केले असते कायमस्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते या तिथीला केलेले दान आणि इतरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावे, या दिवशी आंबे गोरगरिबांना दान करावे, या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ गोरगरिबांना दान करावे, या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोरगरिबांना दान करावे,या दिवशी विविध प्रकारचे झाडे ची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिराभोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी,सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामकरण किंवा मंत्र जाप करावे या दिवशी केलेला मंत्र पठनाची किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नामस्मरणात सुरुवात करू

Post a Comment

Previous Post Next Post