नांदुरा: शहरातील विश्व प्रसिद्ध हनुमान मूर्तीला रिमोट कंट्रोलद्वारे मल्हारपण व विविध धार्मिक कार्यक्रमासाठी 6 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदुरा शहरात येत असल्याची माहिती श्री तिरुपती बालाजी संस्थांच्या वतीने शनिवारी देण्यात आली. श्री तिरुपती बालाजी संस्थान कडून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे यापूर्वी नांदुरा शहरातील हनुमान जन्मोत्सव पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत या निमित्ताने संस्थेकडून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये 105 फूट उंच हनुमान मूर्तीला रिमोट कंट्रोलद्वारे माल्याअर्पण विशेष पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सोबतच यावेळी होणाऱ्या धार्मिक सभेसाठी अतिथी म्हणून जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पिठादिश्वर अंजनगाव सुरजी मठ, महामंडलेश्वर जनार्दन जी हरीजी महाराज फैजपूर, प पू शंकर जी महाराज, जागृती आश्रम शेलोडी, नागपूरचे कामगार आयुक्त श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत महाआरोग्य शिबिर होणार आहे. शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा. हनुमान जन्मो उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थान अध्यक्ष फनेद्र उरेमी यांनी केले. यावेळी कामगार आयुक्त श्रीकांत शिंदे, सचिव नारायण उर्मी, डॉक्टर विजय पाटील, बाळासाहेब धोरण, अंकुश देशमुख ,राजू पाटील उपस्थित होते.
हनुमान जन्मोत्सवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नांदुऱ्यात येणार...
Hanuman Sena News
0
Post a Comment