Hanuman Sena News

मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याने कुत्र्याविरोधात पोलिसात तक्रार...







विजयवाडा: एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे. कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने काही महिलांनी थेट कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार केली. तसंच मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या या कुत्र्याविरोधात कारवाई करा अशीही मागणी केली.आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत असं दिसतं आहे की मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर कुत्र्याने फाडलं. एका भिंतीवर हे पोस्ट होतं जे कुत्र्याने फाडलं. त्यानंतर या कुत्र्याच्या विरोधात विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणणाऱ्या दसारी उदयश्री यांनी उपवासात्मक पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे. काही महिलांना घेऊन त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या त्यांनी पोलिसांना सांगितलं की व्हायरल व्हिडिओ मध्ये कुत्र्या आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे पोस्टर फाढतो आहे.त्यामुळे त्या कुत्र्याच्या विरोधात कारवाई करा पुढे त्या म्हणाल्या की जगमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष 151 जागा जिंकून सत्तेवर आला आहे. अशा मुख्यमंत्र्यांचा पोस्टर फाडून कुत्र्याने त्यांचा अपमान केला आहे. राज्याच्या सहा कोटी लोकांचा या कुत्र्याने अपमान केला आहे. आम्ही पोलिसात या भटक्या कुत्र्या विरोधात तक्रार दाखल दिली आहे. तसेच पोलिसांना हे देखील सांगितलं आहे की लवकरात लवकरच या कुत्र्याला जेरबंद करा कारण आमचा राज्याच्या प्रिय मुख्यमंत्र्यांचा या कुत्र्याने अपमान केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post