मुंबई : महिला व बाल विकास विभागाने एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. यात विधवा स्त्रियांना समाजात मानाचं स्थान मिळावं म्हणून विधवाऐवजी "गंगा भागिरथी" शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अपंगऐवजी दिव्यांग शब्द वापरला जातो, त्याप्रमाणेच आता विधवाऐवजी "गंगा भागिरथी" शब्द वापरण्याचा प्रस्ताव आहे.महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत प्रधान सचिवांना आदेश दिले आहेत. परिपूर्ण प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. विधवा महिला या गंगा आणि भागिरथी प्रमाणेच पवित्र असतात. त्यामुळे यापुढे अपंगऐवजी दिव्यांग, विशेष बालक याप्रमाणेच विधवाऐवजी गंगा भागिरथी शब्दप्रयोग सुरू करण्याचा प्रस्तान राज्य सरकारने तयार केला आहे यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत म्हटलं की केवळ शब्दप्रयोग बदलून विधवा महिलांचा प्रश्न सुटणार नाही यावर सामाजिक कार्यकर्ता हेरंबा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कुलकर्णी यांनी म्हटलं की विधवांना गंगाभागीरथी म्हणावं का अपंगांना दिव्यांग दलितांना हरिजन म्हणून आणि शब्द बदलून वास्तव्य बदलत का शब्द ऐवजी वास्तवात बदल व्हायला हवा शिंदे फडवणी सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे हे पत्र त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना 12 एप्रिल रोजी लिहिले आहे मंत्री लोढा यांनी पत्रात म्हटला आहे की पंतप्रधान मोदीजींनी अपंगा ऐवजी दिव्यांग संकल्पनेची घोषणा केली आणि यामुळे अपंगांना समाजात आदराचे स्थान मिळाले आहे त्यांच्याच प्रति समाजाच्या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल झाला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी विधवांच्या जागी गंगाभागीरथी ( गं. भा. )शब्द वापरण्याचा उत्कृष्ट प्रस्ताव तयार करून त्यावर चर्चा करण्यात यावी.
विधवा स्त्रियांना समाजात मानाचं स्थान मिळावं; विधवा ऐवजी गंगा भागीरथी शब्दप्रयोग करावा...
Hanuman Sena News
0
Post a Comment