बुलढाणा: बुलढाणा म्हणजे मूळचे भिल्ल ठाणा या परिक्षेत्रात भिल्लांची दाट वस्ती असल्यामुळे या गावाला भिल्ल ठाणा म्हणायचे पुढे या नावाचे अपभ्रंश होऊन बुलढाणा झाले मात्र भिल्ल समाजाचे अस्तित्व आणि त्यांची संस्कृती अजूनही या मातीची एकरूप आहे दोन एप्रिल रोजी राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन बुलढाण्यात होऊ घातले आहे जिजामाता विद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र राज्य विर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटने द्वारा या ऐतिहासिक भिल्ल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आद्य क्रांतिवीर तंट्या भिल्ल आणि सर्व आदिवासी अनाम स्वातंत्र्याच्या लढ्यास समर्पित असलेले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकलव्य आदिवासी कर्मचारी संघटनेचे डॉक्टर अनिरुद्ध रामचंद्र गायकवाड उपस्थित राहणार आहे तर शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी जिजामाता महाविद्यालयाचे दिलीप मोरे यांच्याकडे संपूर्ण करण्यात आली आहे संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव शिंदे, बुलढाणा अर्बनचे डॉक्टर सुकेश झंवर, विश्वनाथ माळी, प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे, एडवोकेट अमोल बल्लाळ ,जगदेव बाहेकर, जागृती कुमरे ,छायाताई पवार ,पोलीस अधीक्षक डी एस माळी ,दिलीप मोरे, रामेश्वर युनाते, आधी सहभागी होणार आहेत. दुपारी बारा वाजता कवी संमेलन होईल यात राज्यभरातील काही प्रमुख आदिवासी कवी तसेच बुलढाणातील चळवळीचे प्रवाहक कवी असणार आहे त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे आदिवासी सेवा पुरस्कार म्हणून पाच जणांना पुरस्कार दिला जाणार आहे .या साहित्य संमेलनाचा सर्व साहित्य रसिकांनी तसेच आदिवासी बांधवांची ऋणानुबंध जपणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आनंद घ्यावा असे आव्हान महाराष्ट्र वीर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटनेने केले आहे.
बुलढाण्यात आज आदिवासी भिल साहित्य संमेलन...
Hanuman Sena News
0
Post a Comment